श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी मठाच्या सार्ध पंचशताब्दी महोत्सवानिमित्त दिनांक २७ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर २०२५ या कालावधीत धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.
या महोत्सवाच्या निमित्ताने मंगळवार दि. २ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ७. ३० वाजता जिवोत्तम मंडप पर्तगाळी येथे विशेष नांदी दर्शन हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला जाणार आहे.
मठाधीश परमपूज्य श्रीमद विद्याधीशतीर्थ स्वामी महाराजांच्या प्रेरणा आणि संकल्पनेतून साकारलेली ही कलाकृती गोमंतकातील प्राचीन नाट्यपरंपरेचा अद्वितीय अनुभव रसिकांना देणार आहे. गोमंतकातील अनेक सारस्वत देवस्थानांतून पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या नाट्यपरंपरेत नांदी हा नाटकाचा मंगलारंभ मानला जातो. या परंपरेतील १५ देवस्थानांतील नांद्या तसेच संगीत नाटकांतील दोन प्रसिद्ध नांद्या संगीत शाकुंतल आणि संगीत मानापमान यांसह एकूण १७ नांद्यांचा भव्य कलाप्रयोग ना

Goa News Hub

AlterNet