(५७५ कलाकार, १७ नांदी आणि १५ देवस्थानांचा पवित्र आणि भावरम्य अविष्कार)

प्रतिनिधी:

श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी मठाच्या सार्ध पंचशताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने दिनांक २७ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर २०२५ या कालावधीत धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची दिव्य मालिका आयोजित करण्यात आली आहे.

या पावन महोत्सवाचा एक विशेष सोहळा म्हणून मंगळवार दि. २ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ७.३० वाजता जिवोत्तम मंडप, पर्तगाळी येथे नांदी दर्शन हा सांस्कृतिक कार्यक्रम रसिकांसाठी सादर करण्यात येणार आहे.

मठाधीश परमपूज्य श्रीमद विद्याधीशतीर्थ स्वामी महाराज यांच्या प्रेरणा, कृपा आणि दूरदृष्टीतून आकारलेली ही अद्वितीय कलाकृती गोमंतकातील प्राचीन नाट्यपरंपरेचा सांस्कृतिक ठेवा नव्याने उजाळून देणारी ठरणार आहे. पिढ्यानपिढ्या जतन झालेल्या या परंपरेत नांदी हा नाटकाचा मंगलारंभ मानला जातो आणि आजही ती कला भक्तिभावाने जोपासली जाते.

See Full Page